बादशहाचा पोपट


     नुकताच पेपरात एक लेख वाचला.  नाव, विषय काहीतरी होतं, पण सगळा लेख अगम्य भाषेत लिहिलेला. मोठे मोठे शब्द आणि लेखाशी संबंध नसणारी अवतरणं, उदाहरणं आणि वाक्प्रचार लिहून सजवलेला , पण स्पष्टपणे माणूस बोलेच ना . मूळ विषय कळेल, तर  ना !   विनोदी - 'हलकं फुलकं' - लिहिलं तर २ क्षण हसायला तरी येतं, इथे तर सकाळी सकाळी बिनसाखरेचा चहा प्यायल्यावर होतं , तसं तोंड झालं ... असो ... आत्ता मी ही तेच करतेय ना ... असो मुख्य विषय असा ... 

    बादशहाचा पोपट ... !    लहानपणी आपण सर्वांनी ऐकलेली गोष्ट ... आणि आता नातवंडांनाही सांगून झालेली  !   तिचा प्रत्यय आजकाल फार म्हणजे फारच वेळा येतोय .  मुलं लहान असतांना त्यांना ही गोष्ट सांगितली होतीच की , कसा अकबर बादशहाचा पोपट पडला होता ..आ वासून ..उताणा पडलाय , डोळे बंद आहेत , हलत नाहीये , बोलत नाहीये वगैरे ....पण बादशहा सुळावर देईल म्हणून कोणी स्पष्ट बोलेना की तो मेला आहे ....!.

    ...तर,  मुलं लहान होती , तेव्हा बहुतेक - नव्हे तेव्हाही बहुतेक - मी जरा terror बाज असले पाहिजे !   गोष्टीतल्या बादशहासारखीच !   ...काही महत्वाची , महागातली गोष्ट  फुटली, की त्याचा बादशहाचा पोपट व्हायचा !   "आई ... "      "हं "      "आई"   "हं, पुढे बोला ..."     "आई .. "      "काय ?   काय झालं ?"     "आई .."     "तोंड उघडून नीट बोलतोस का ?...   कां मला स्वप्न पडणार आहे ? ... उगीच   नाकडोळे पुसायचे नखरे करू नका ...काय झालंय ते स्पष्ट सांगा "      "आई, ... ते  .. नं ... तुझ्या आरश्यासमोरची सेंटची बाटली ... ती नं ... तिचं झाकण निघालं ... आणि त्या बाटलीला ... "......."सरळ सांगा, ती बाटली फुटली म्हणून ..." ....  "actually, तीच नाही, आमचा बॉल घड्याळावर आपटला जोरात ... आणि सगळं ... ते खाली आलं "     "तोच का मगासचा आवाज ...?"       भारी पैकी खेळणी मोडली की,  "... ते निसटलं, जॅम झालं, निघालं, एक तुकडा बाहेर आला, किल्ली अडकून बसली ..".    वगैरे निरनिराळ्या तऱ्हांनी सांगायचं ... तेव्हाही असंच डोकं फिरायचं ... 

    त्यानंतर असे अनुभव खूपदा आले ... मुलांच्या लग्नाची वेळ आली, तेव्हा रीतसर - चाकोरीबध्द जावं ... शक्यतोवर सगळं 'नीट' करावं - म्हणजे काय कोण जाणे - पण नंतर कुणाची बोलणी खायला नकोत, म्हणून अगदी 'चाकोरीबध्दच' जायचं ठरवलं .    मुलाची पत्रिका वगैरे करून घेतली. त्या निमित्ताने नेहमीचे गुरुजी, कुणी हौशी मंडळी, कुणी 'computer बाबा',कुणी professional पत्रिका करणारे ... असे लोक गाठले आणि पत्रिका करायला टाकली !   तेवढंच पहावं.... त्यांची एकवाक्यता होते का ?   कारण पंचांग बदललं की सगळंच बदलतं .!!.. योग काय आहेत आणि ग्रहांची position काय ? कोण कुठल्या घरात आहे .... एक नव्हे प्रत्येकाचं interpretation वेगळं ... "हं ... हा ग्रह उच्चीचा आहे ... पण ,  हा दुसरा नेमका पाचव्या घरात आहे, सातव्यात असता तर ...या दोघांची युती आहे ... कोणी अस्ताला जात आहे ".…..  हो का ! म्हणजे त्यांनाही नशिबाचा फेरा चुकत नाही ... कोणी उगवतो तोच ग्रहण लागलेला किंवा तसलंच  काहीतरी.  शेवटी माझा patience संपला ... अरे असू द्या, कोण कुठे आहेत ते ... पण त्याचा अर्थ काय ?   प्रत्येक ग्रहाची स्थिती ऐकल्यावर माझा एकच प्रश्न ... "म्हणजे काय "....."म्हणजे , म्हणजे" ..." वाघाचे पंजे  "   मीच म्हणून टाकलं ," पत्रिका वाईट / चूक काय ते स्पष्ट बोला ... जे काय असेल ते ... "   उगीच काय बादशहाचा पोपट..... ?

    त्यानंतर काही वर्षांनी full medical check-up करायची वेळ आली.  सगळे सोपस्कार झाल्यावर, ते reports चं   बाड घेऊन आम्ही डॉक्टरांच्या समोर ... "हं ... बघितले मी सगळे reports ... काय मग ? काय करायचं ?" ते म्हणाले …..." ते तुम्ही सांगा , तुम्हाला माहीत .." हे सगळं मी  मनात . कारण , भीतीने माझी दातखीळ बसली होती ! " तर , इन्शुरन्स वगैरे नाहीये , म्हणता ? " , ते म्हणाले . " नाही नाही , पैशाची चिंता करू नका , जे काही करायचं , ते करू आपण .." नवरा उगीचच मध्ये ! त्याला विचारावंसं वाटलं , " मग , एरवी कसा काय सारखा इकॉनॉमी  इकॉनॉमी करत असतोस ?" ...."नाही , तसं नाही ," डॉक्टर म्हणाले ." काही झालं नाहीये मला, उगीच काय राईचा पर्वत करतोयस ?.. " मी जरा जोरातच म्हंटलं . " No no , don't worry " , डॉक्टर म्हणाले . " पटकन काय झालंय ते सांगा " अर्थातच , मी हे मनात . मग त्यांनी सुरू केलं ," ..ह्याची लेव्हल वाढलीय , ते कमी का आहे , हे दुरुस्त करायला पाहीजे ...B, D , HDL , PPS , Hb ...त्यांनी बरीच ABCD म्हंटली .....एक अक्षर कळेल तर शपथ ...पहिलीच वेळ होती अश्या medical checkupची ...दर अक्षराला .... " म्हणजे काय ?...जरा explain करता का ..." शेवटी मी इंग्रजीचा आधार घेतला , जरा सौम्य वाटतं !...पण , असं का छळावं यांनी ... बादशहाच्या पोपटांचे थवे च्या थवे ......आणि मी डोक्याला हात लावून बसलेली......" . बऱ्याच मोठ्या lecture नंतर ते 'सांगू की नको ' अश्या थाटात म्हणाले , " ...तसं काही तुम्हाला झालं नाहीये , ...रोज सकाळ- संध्याकाळ walk ला जा , उन्हात बसा , आणि...मुख्य म्हणजे ....खाणं कंट्रोल करा ...की झालं , ".... ....म्हणजे....  वजन कमी करा .!....हात् तिच्या ...हे तर नुसतं पाहून कुणालाही कळेल , की ....पोपट मेलाय ! ते एवढं 'घुमा फिरा के' कशाला सांगायचं ?... 

      अरे हो , तो लेख नं , ज्याच्यामुळे एवढं पांढऱ्यावर काळं केलं ते ...तो विषय तसा नेहमीचाच .म्हंटलं तर सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा ...नाहीतर नावडीचा ...तो होता पर्यावरणाचा ऱ्हास... शेवटी शेवटी कळलं , की ते लिखाण आपल्या घिस्या पिट्या , चुकीच्या life style बद्दल होतं , ज्याच्यामुळे तो ऱ्हास झाला !...

       OK ,  म्हणजे हा तो बादशहाचा पोपट ...आता , तो endangered आहे का extinct झालाय already ....त्याचा तोच जाणे...!




Comments

  1. झकास. पूर्ण भट्टी जमली आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you so much !!😊

      Delete
    2. Thank you so much ! 😊

      Delete
  2. झकास लिहिलं आहेस. कसं ग सुचत तुला

    ReplyDelete
  3. खूप खूप धन्यवाद ! मनात येईल ते लिहून टाकायचं ...!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland