सुनीता विल्यम्स


    सुनीता  विल्यम्स  ... ती परत आल्यापासून माझ्या डोक्यात विचारांचं थैमान सुरू आहे ...ती कोण आहे... ?... एक दुर्दम्य आशावाद ... का विश्वास ... मग तो देवावर किंवा आपल्या विज्ञाननिष्ट विचारांवर, आपल्या सहकाऱ्यांच्या कर्तबगारीवर, हुशारीवर ? ... का मन भारून टाकेल , अशा आत्मविश्वासावर - conviction वर ... ?    ह्यातलं काय आहे तिच्यात ?    कशाची बनली आहे ती ?    माणसासारखी माणूस, स्त्री सारखी स्त्री ...मग कुठल्या का वंशाची , देशाची असेना ...का कुठल्या धातूने , कुठल्या तरी अतिमानवी इच्छेने, ध्येयाने किंवा अफाट, अचाट शक्तीने घेतलेलं मानवी रूप ?  .... काय आहे ती ?

    ती आठ दिवसांकरता अंतरिक्षात गेली space station वर.   आपण हे असं बोलतो, इतकं सहजतेने ... जसं काही पुण्याहून मुंबईला गेली ... नोकरीला ... सकाळी जाऊन संध्याकाळी परत येणार असं ... आणि तिथे अडकली ... जसं काही , मुंबईत पाऊस पडल्यावर लोकल बंद पडाव्यात ... आणि मग  ... मग काय ?   किती गदारोळ होतो त्याचा, social media काय, न्यूज काय, पेपरात काय ...तऱ्हतऱ्हेच्या headlines ... आणि मग दुसऱ्या दिवशी पाणी ओसरल्यावर सगळ्यांचे 'चित्तथरारक' अनुभव  ...!!   किंवा कल्पना करा, एखाद्या  बोगद्यात आपली ट्रेन अचानक थांबली ... दहा मिनिटं ... वीस मिनिटं ... अर्धा तास ... काय गहजब होतो, अन रात्र असेल , दिवे मिणमिण होऊ लागले तर ?... आणि ही अंतराळ स्थानकात नऊ महीने अडकली ... काय झालं असेल तिचं ? अनिश्चित काळासाठी ..बंदीस्त... एवढ्याशा जागेत ?.. आधीच तिथे इतकं विचित्र वातावरण ... तरंगतं जिणं ... भयानक एकटेपणा ... सतत संपर्कात असेल ती लोकांच्या, पण ते सगळं virtual ... फक्त चित्र दिसणार TV सारखं monitor वर !    आपण गावाला गेलो आणि काही कारणाने , काही 'तांत्रिक अडचणींमुळे'  परत येणं पुढे ढकललं गेलं तर आपलं काय होतं ?    किती चिंता, किती कटकट, किती  बडबड चालू असते आपली ... 

    त्याउलट ही सुनीता ... आपलं परत येणं postpone झालंय का cancel झालंय ??...   थोडक्यात, परत यायला मिळणार आहे का नाही ?   यानात जर एक बिघाड अचानक होतो, तर तसला किंवा दुसरा काही बिघाड झाला ... समजा oxygen generator बंद झाला, किंवा दुसरं कोणतंही यंत्र बिघडलं, तर कोणत्याही क्षणी सगळा खेळ खलास ... हे असलं tension ... तिनं कसं सहन केलं असेल ?.. 

    जेव्हाही पहावं, तेव्हा ती हसतमुख असायची ... आणि positive च बोलायची.    कुठून आली ही शक्ती ?    का अशा extreme stress मधे शांतच राहतील, अशाच लोकांना ते निवडतात ... ?    का अशा कठीण challenging परिस्थितीत माणसाचं खरं बळ, इच्छाशक्ती, विजिगिषा उभरून येते ?  इथे  साधं गर्दीमध्ये बस पकडायची म्हटलं, तरी छातीचे ठोके धाड धाड वाढतात आपले ... हिला तर परत आणणारी 'बस' येते का नाही, हाच प्रश्न !! ....                                             ह्या मोहिमेत ती select झाली , तेव्हा तिला ह्या सगळ्याची कल्पना असणार , तिच्या मनाची पूर्ण तयारी ही असणार ..वगैरे सगळं खरं आहे . अशी वेळ येणार नाही , असं कितीही म्हंटलं , तरी प्रत्यक्षात तशी वेळ आली , की पाय च काय , सगळंच लटपटलं नसेल ?... शेवटी माणूसच आहे नं ...

    ... कितीही विचार करायचा नाही,  म्हंटलं , तरी अनेक अंतरीक्ष यानं , त्यांच्या launching च्या वेळी किंवा landing च्या वेळी अक्षरशः जळून गेली  . '६७ साली अपोलो -१ जळून गेलं ... '८६ साली space shuttle Challenger हे launch झाल्या झाल्या , काही क्षणात बेचिराख झालं .... २००३ मध्ये Columbia पृथ्वीच्या वातावरणात reentry च्या वेळी जळलं ....  अपोलो - ११ तुन माणूस चंद्रावर उतरला ! ह्या नेत्रदीपक यशानंतर , अपोलो - १३चं अपयश ....या मोहीमेला 'successful failure' म्हणतात , कारण, यानात बिघाड झाल्यामुळे , मोहीम अर्धवट सोडावी लागली , पण  त्यातल्या तिन्ही अंतराळ वीरांना सुखरूप परत आणता आलं !...

          सुनीताची ही मोहीम पण अशीच successful failure नाही का ?..इतके महीने टांगणीला लागून परत निघाल्यावर ही इथं पोहोचेपर्यंत , land झाल्यावर ही , यानातून बाहेर येईपर्यंत , एक जरी चूक , अगदी बारीकशी ही झाली , तरी एका क्षणात होत्याचं नव्हतं व्हायचं ...मृत्यू असा दबा धरून - नव्हे - 'आ' करून बसलेला.... त्याला हुलकावणी कशी दिली तिने ? ...आणि तिच्या सहकाऱ्यांनी मिळून ? सुनीता आणि तिचा सहयात्री Butch wilmore , यांच्या rescue operation चा vdo तर एखाद्या sci -fi फिल्म सारखा ..!!....किती precision , काय timimg , केवढी व्यवस्था ....सगळंच जगावेगळं , आपल्या जगाच्या पलीकडलं ...अचंबा ..... केवळ अचंबा ....!!

       ... ती तिथे अडकली , हे news मध्ये ऐकल्यावर माझं मन म्हणालं , ...झालं , आता काही ही परत येत नाही ...मनाला पीळ पडत होता.   ३ महीने ... ६ महीने ...आता ती परत यायच्या आशेवर जगेल .... का निराशेत खंगून खंगून ××× , तो शब्द ही लिहवत नव्हता ....राहून राहून कल्पना चावला ची आठवण येत होती ....तसं नाही नं होणार ... सुनीताच्या जीवावर आपणच पाणी सोडलं होतं ...पण , ती परत आली ...!!!!

        काय बलवत्तर नशीब आहे पहा !!! आयुष्याची दोरी मस्त बळकट ...लोखंडी सळयांनी reinforce केलेली !!! का तिच्या पत्रिकेतले ग्रह महा उच्चीचे ?? ...(आमची मजल इथपर्यंतच... advanced technology , alternate plans , collective efforts , यांना आम्ही मानतच नाही ... )       

        ....अंतरीक्षातल्या या ग्रहांच्या दिशेला झेप घेऊन , त्यांना 'हॅलो ' म्हणू इच्छिणारी ही मुलगी , तिला सुखरूप परत पोहोचवण्याशिवाय त्यांना गत्यंतरच नसावं .....!!!...

        आणि काय लिहावं ??...माझे विचार , माझे शब्द , माझ्या कल्पना ....सर्वच थिट्या  .... तिचं कौतुक करायला कमीच पडणार .... एक आश्चर्य ....एक जिवंत आश्चर्य ....जगाच्या इतिहासात , अंतरीक्षाच्या शोधात , अमर झालेली ...सुनीता विल्यम्स .....!!!!

 

- सौ अलका कुंटे, बंगलोर

   +९१ ८७६२३ १६३८५

Comments

  1. अलका,अगदी आमच्या मनातील भावना व्यक्त केल्यास..

    ReplyDelete
  2. अलकाचे चणे कुरमुरे

    सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर यांच्या घरवापसी वरून आणि त्यांच्या मानसिकअवस्थेची नुसती कल्पना करून ही आपल्या सगळ्यांच्या डोक्यात केमिकल लोच्या झाला होता. ते दोघे कोण होते आपले. म्हटलं तर कुणीच नव्हते मग आपला जीव सुद्धा त्यांच्यासाठी का तीळ तीळ तुटत होता. त्याला कारण म्हणजे मानव कल्याण करण्यासाठी ते करत असलेले अतुलनीय काम.

    लहान मूल बोट पकडून आपल्याबरोबर चालते किंवा लहान मुलाला हवेत उडवून झेलतात त्या वेळी ते आनंदाने खिदळते, कारण त्याला माहित असते की *I am in safe hands* अगदी तशीच भावना या दोघांची असावी. म्हणून ते अत्यंत बिकट आणि प्रतिकूल परिस्थितीत एक दोन दिवस नाही तर तब्ब्ल नऊ महिने काढले. कारण त्यांना पक्के ठाऊक होत की *There is a hope* या विस्वासावर ते होते.

    विज्ञान आपलं काम करत होत. त्याच्या जोडीने साऱ्या जगाने देखील त्या दोघांसाठी आपापले देव पाण्यात घालून ठेवले आणि त्यांच्या परतीसाठी प्रार्थना केल्या.अखेर तो क्षण आला आणि ते दोघे पृथ्वीवर सुखरूप पोचले आणि साऱ्या जगाने निश्वास सोडताना म्हटले,

    *तू धैर्याची असशी मूर्ती*

    प्रसाद

    ReplyDelete
  3. धन्यवाद , प्रसाद ! तुझ्या लिखाणाशिवाय हे पूर्ण होत नाही !! Thanks a lot !! 👍💐

    ReplyDelete
  4. TETHE KAR MAZE JULATI . ALAKA YOU HAVE DONE WELL , FORGOT MY PHONE.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you , Yashodhar !

      Delete
    2. Thank you , Yashodhar

      Delete
  5. छान,शांता

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland