Alice in Wonderland - 2
... orchid garden पाहिल्यावर डोळे, मन निवले होते ... पण पाय दमले होते. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर जवळचे २ - ४ मॉल पालथे घातले. शॉपिंग थोडंसंच , पण त्याचा ही 'श्रीगणेशा' करायलाच हवा, नाहीतर शेवटी घाई घाई होते, किंवा त्याला कात्री लागते ... म्हणून थोडंसंच केलं ... आणि पुढचा दिवस ...
आज काय पहायचं, असं म्हणेस्तोवर प्लॅन झालेला होता. आज River Wonders. पाणी आणि पाण्याच्या आत आणि आसपास रहाणारं प्राणी जगत ! असून असून किती असणार ... म्हटलं बघू चला, लवकर आटपेल, घरी येऊन झोप काढू ...
... निघालो आणि surprises सुरु ! टॅक्सीत मी समोर बसले, छान view यावा म्हणून, आणि बघते तर dashboard वर एक छानसा सुबक गणपती, समोर उंदीरमामा, मोदक, उदबत्ती ... हे सगळं एका सुंदर प्लास्टिक case मधे . बाप्पाच्या डोक्यावर एक सोनेरी छत्र ! मी न राहवून त्या ड्रायव्हर ला विचारलंच ... this Ganesh idol ... ?? तर तो म्हणाला, "I pray to Ganesh !" तो चिनी होता, धर्म मी नाही विचारला ... गणपतीची मूर्ती आहे गाडीत, अजून काय पाहिजे ? दिवसाची सुरुवात झकास झाली होती !!!
बरंच अंतर गेल्यावर, हळूहळू घनदाट जंगलात जातोय असं वाटलं ... इतकी झाडं ... त्यातून वळणं वळणं घेत पुढे गेलो तर तिथे चार फाटे ... एक Botanical Garden, एक हे River Wonders, एक Rain Forest आणि चौथं Bird Park. ३-४ वर्षांपूर्वी ते इथे shift झालं ! आम्ही River Wonders ला गेलो.
आता काय पाहूया, असा विचार करत आत fishes area त गेलो. ५' x १०' असे टँक आणि त्यात पहिल्याच सलामीला ... डोळे दिपले ! अगदी छोटे छोटे निळे निळे मासे थव्या थव्यानं इकडून तिकडे फिरत बागडत होते ! ! !... स्वच्छ पाणी, त्यात खूप पाणवनस्पती ... कुठेही शेवाळं वगैरे काही नाही ... मधे मधे सुंदर दगड मांडलेले आणि त्यात तो चमचमणारा निळा थवा अक्षरशः विहार करत होता ! इतका सुंदर निळा रंग फार क्वचित दिसतो ! चार पाऊलं पुढे गेलो, तर तिथे पिवळे, orange , ठिपक्या ठिपक्यांचे मासे ! तसेच थव्या थव्यानी पोहत होते ! कुणाचे आकार कसे, तर नखा एवढे ते भले मोठे ! आधी पाहिलेल्या orchids शी स्पर्धा करणारे, ती फुलं एका जागी शांतपणे बसलेली , तर हे सतत इकडून तिकडे , त्याला खळ नाही ......
जसे पुढे गेलो, तसे मासे आणि tanks मोठे होत गेले. पुढे एक टँक तर २०' x २०' x ५०' एवढा मोठा. त्यातच एक ५-६ फूट लांब मासा , असे बरेच , आणि काही निराळे ही , एकमेकांना त्रास न देता ! तर , त्या माश्याच्या शरीरात म्हणे कैक हजारो वर्षात काहीही बदल झालेला नाही. डायनासॉर युगात जसे होते तसेच आज पण आहेत ... ! त्यांची पाणी तोंडातून घेऊन ते बाहेर टाकायला निसर्गाने दिलेली श्वसनाची भोकं होती, ती एखाद्या विमानाच्या खिडक्यांसारखी !
मासे पाहून पुढे गेलो, तिथे पाण्यातले प्रचंड साप , कासवं तर इतकी शांत ... थोडा वेळ मला वाटलं की हे टाक्यातलं decoration च आहे ... तर थोड्या वेळाने त्या कासवाने हळूच एक डोळा उघडला, मग दुसरा ! No wonder ते १५० - २०० वर्षं जगतात ! मग एका ठिकाणी सुसरी आणि मगरी, त्यातल्या कुणाला काय म्हणतात, ते त्याच जाणे ... पण केवढे ते सुळे ! तिथे dolphins पाहिले ... हसरे, छानसं smile, फोटोला द्यावं तसं ! तिथे आपल्या गंगेतल्या dolphins ची माहिती ही एका फलकावर होती ! लगेच फोटो काढला ! मग Panda पहायला गेलो. तिथे दोन होते, एका इटुकल्या पिल्लाचे आई-बाबा. पण त्या पिल्लाला सरकारने जनतेपासून , सोशल मीडिया पासून , दूर ठेवलंय ... त्याची स्पेशल काळजी ... नुकताच त्याचा दुसरा वाढदिवस पण केला गेला ! तिथेच पलीकडे स्वैपाकाचा ओटा असावा तसा देखावा करून त्यांच्या रोजच्या जेवणात काय काय आणि किती असतं त्याची माहिती ... इतकी colourful ! हे आई-बाबा आपापल्या भागात बांबू सोलून खात होते ... आपण ऊस सोलून खातो तसा !
... मग ... तिथं एक प्रचंड मोठं तळं ... क्षितिजापर्यंत निळं पाणी आणि काठा काठा ने हिरवीगार झाडी ... त्यावर एक सुंदर पूल, आपल्या सिनेमात असतो तसा ! आणि पुला पलीकडे बोट ride ... पाण्यावर होती म्हणून बोट म्हणायचं, पण ती होती दोन रुळांवर ... आणि ती चालणार होती एका स्पेशल चॅनेल किंवा कालवा म्हणा, त्यातच. बाकी सगळं ऑटोमॅटिक , नावाडी वगैरे कोणी नाही ... एकदम रिमोट कंट्रोल . दोन्ही काठांवर पाण्याजवळचे पक्षी, प्राणी, painted storks, flamingoes , खूप माकडं , एक दोन बिबटे - नशीबच की बिबटे काचे पलीकडे होते - पण पक्षी, माकडं वगैरे सुट्टे , पिंजरे नव्हते. कौतुकाची गोष्ट म्हणजे बोटीतील कोणीही त्यांना हुश्श कर, शिट्ट्या मार, चुरमुरे टाक ... असलं काहीही करत नव्हते . आमची बोट मधे मधे चढ उतार घेत, पाणी उडवत पुढे. मी धिटाईने सगळ्यात पुढे बसले होते. पाण्याला अतिशय घाबरणारी मी, माझी सगळी भीती कासच्या ट्रिप मधे कोयनेत बुडवून आले बहुतेक ! कपडे, डोकं भिजलं आणि दहा मिनिटात वाळलं सुद्धा ! मग Sea Cows...! प्रचंड पोतं च्या पोतं ... पोहोणारं ... तसंच otter , काचेच्या बोगद्यातून जातांना वरती पाहिले . तसेच बेडूक ! इतक्या तऱ्हांचे, रंगांचे, मजाच वाटली त्यांची ! इतके पाण्याजवळ रहाणारे पक्षी ! एकेकाचे रंग , पंख , मासे पकडायची हातोटी !!! ...पहातच रहावं ...
एका संध्याकाळी बाहेर पडलो ... MBS ... मरीना बे सँड्स ... त्याच्या एका भागात Gardens by the Bay ... नदीच्या का खाडीच्या काठा काठा ने बगीचा - बाग आणि बरंच काही ! आखीव-रेखीव, स्वच्छ सुंदर रस्ते, दोन्हीकडे फुलंच फुलं ... ! तिथे वेगळंच सृष्टी सौंदर्य ! मोठ्ठाले limestones, त्यातला काही भाग वाहून गेल्यावर मधे खिंडारं पडलेली. ते दगड ८-१० फूट उंच. त्यात आणि आजूबाजूला फुलझाडं लावून, बसायला बेंचेस ठेऊन, प्रत्येक ठिकाण आजच्या भाषेत म्हणजे 'फोटो स्पॉट' ! एका ठिकाणी एक कोरीव चायनीज स्तंभ ! त्याच्या भोवती पायऱ्या पायऱ्यांचा गझेबो सारखा कट्टा, त्याला छान कठडा वगैरे आणि मध्ये तो कोरीवकाम केलेला खांब ! तो पाहतांना एक छोट्या पांढऱ्या फुलांचं झाड दिसलं. सहज जवळ गेले - मोगऱ्यासारखं वाटलं म्हणून - तर तो पण एक खडक ! त्यात पांढऱ्या फुलांसारखे दिसणारे दगड, निसर्गतःच असलेले ! एका छोट्या आडवळणावर ते प्रचंड दगड आणि मोठ्ठया पानांची झाडं, खरंच Jurassic Park चा feel !खूप फोटो काढले...पण , ह्या प्रेक्षणीय स्थळांपेक्षा, तिथे उभी असलेली मी ... असेच सगळे फोटो आले !
तिथे एक प्रचंड ८-१० फूट व्यासाचं जराश्या उंच चौथऱ्यावर फुलझाडांनी बनवलेलं घड्याळ ... आकड्यांऐवजी फुलांचे ताटवे , बाकी वेगवेगळी रंगीत झाडं , फुलं ... घड्याळाचे काटे लाकडी किंवा आता प्लास्टिकचे असावेत आणि ते विजेवर चालणार ... बंगलोरच्या लालबाग मधल्या फ्लॉवर क्लॉक चा भाऊ ! तिथून शेजारीच Cloud Forest आणि Flower Dome , असे दोन मोठे डोम पहायला जाणार तर तोपर्यंत त्यांची बंद व्हायची वेळ झाली .
निसर्गाचं माणसानं रचलेलं कौतुक - रूप पाहिलं आणि जरा पलीकडेच Super Tree Grove पहायला गेलो. सिमेंट, स्टील आणि fibre glass चा सांगाडा केलेलं खोटं झाड आणि त्याच्या बुंध्यावर सगळीकडे लटकत्या कुंड्यांमधे खरी खरी झाडं , वेली वगैरे. ह्या झाडाच्या सांगाड्यात जागोजागी वेगवेगळे रंगीत LED लावले आहेत आणि रोज संध्याकाळी संगीतावर Sound and Light शो असतो. आम्ही त्यातला एक गाठला , त्याला तिकीट नाही. आम्ही जागा शोधून बसलो. लोकं जमिनीवर, रस्त्यावर, झोपून, लोळून, एकमेकांवर रेलून 'शो' पहात होते. ती १५-२० मिनिटं कधी संपली ... का संपली ... असंच ! lighting असं केलेलं की इथून छान दिसतंय का तिथून, मोक्याची जागा, वगैरे हमरी - तुमरी नाहीच. कुठूनही पाहिलं तरी ३-४ super trees दिसणारंच.
त्याच्या दृष्टीपथाप्रमाणे स्वतःचा वेगळा - स्पेशल शो दिसणार ! .... अप्रतिम ! तो पाहून तिथून उठून एका नदीवरचा पूल चढून MBS च्या स्पेशल टॉवर पाशी ! वाटेत नदीच्या पात्रात २ प्रचंड सोनेरी पुतळे ... चितूर ... इतके चकाकत होते की फोटोत नीट येत पण नाहीत ! त्या टॉवर वरती एक महाप्रचंड बोटीसारखा डेक, तिथे जायचे तिकीट ५० डॉलर, खाण्यापिण्याचे वेगळे ... कोल्ह्याला द्राक्षं आंबट ... मला उंचावर गेलं की घेरीच येते बाई ..... !!!
तिथून खालूनच बोटीकडे डोळे भरून पाहून घेतलं आणि मरलायन च्या समोर येऊन बसलो. पाच मिनिटांत इथला दुसरा शो सुरु झाला, music च्या तालावर नाचणारी पाण्यातली कारंजी आणि त्यावर वेगवेगळे रंगीत प्रकाश झोत ! बरेच लोक बोटींतून हा शो पहात होते अन मजा करत होते. तिथेच बाजूला London Eye सारखा Singapore Flyer म्हणजे आकाशपाळणा, एक सुंदर कमळासारखं Art and Science Museum, Durian ह्या फळासारखं डिझाईन असलेली दोन theatres ... अहाहा ... माहौल असा की तिथेच बसून रहावं ... ! मरलायन ची मजा की त्यात सिंह - सिंहीण असा फरक आहे च. 'फू sss ' करून पाणी उडवणाऱ्या सिंहीणी दोन आहेत. आणि सेंटोसा बेटावरचा नुसताच उभा असलेला सिंह आहे ! ही एक मजाच ... !
तो डोळे दिपवून टाकणारा शो पाहून परत येतांना MBS Complex पाशी एक मॉडेल पाहिलं ! ते ह्या complex च्या समोरच, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या खूप जुन्या Fullerton Hotel चं ! इथे आलेल्या पहिल्या ब्रिटिशांपैकी एक ... Mr Fullerton . सिंगापूरच्या उभारणीत त्याचा खूप मोठा वाटा - भलेही ह्या सगळ्या गोष्टी त्याने त्यांच्या लोकांकरता केल्या. पण त्याचा उपयोग local लोकांनाही झालाच नं - तर ते मॉडेल Lego च्या blocks नी केलेलं आहे. अगदी हुबेहूब. इथे उभं राहून ते मॉडेल पहावं आणि समोर ते हॉटेल खरं खरं पहावं ... ! एक छान आयडिया !
रात्री घरी यायला नऊ वाजून गेले होते. बसमधून उतरून घराकडे चालतांना बाजूच्या हॉटेलच्या समोर रस्त्यावर काहीतरी चमचमणारं दिसलं ... हॉटेलच्या पायऱ्यांपर्यंत. मुलाला म्हटलं, असं बघ, कसं अभ्रक सांडल्यासारखं दिसतंय ... ! तर तो हसायला लागला, "अगं, ते डांबर घालतांना बारीक बारीक LED Lights बसवले आहेत आणि त्यावर hard plastic असतं, म्हणून ते तुटत नाही ... कितीही वजन आलं तरी ." मी 'आ' च ! जमिनीवर, रस्त्यावरही light show ?!! ... नवलच आहे सगळं ... !!! Surprises चालूच....
- सौ अलका कुंटे, बंगलोर
+९१ ८७६२३ १६३८५
वाह् मस्त वर्णन ! पुनः प्रत्यय आला ! 👍👍👍
ReplyDeleteThank you !!☺️
Deleteउत्तम प्रवास वर्णन...मस्त फोटो...
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद !
Deleteसिंगापूर ट्रीप चा पुन्हा एकदा लाइव्ह फील अनुभवायला मिळाला
ReplyDeleteThank you , चंदू !
Deleteखूप छान वर्णन आणि फोटो देखील मस्तच खरं प्रत्यक्ष बघितल तर काय होईल ते सांगवत नाही. तू लिहिलेलं वर्णन वाचून खूप छान वाटलं.
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद !
Deleteअलका, सिंगापूर दर्शन आणि वर्णन छान . खूपच छान मजा आली वाचताना.
ReplyDeleteThank you so much !!
DeleteNOW I HAVE SEEN THE SINGAPOR THRU YOUR EYES AND ESSAY.IT IS NOT NECESSARY TO GO THERE NOW, GOOD DISCRIPTION AND FANTATIC PHOTOES.
ReplyDeleteThanks a lot , but you should go !!! ....it is fantastic , but you have to walk and walk ...quite a lot !!!😊
Deleteअलकाचे चणे कुरमुरे
ReplyDeleteAlice in Wonderland - 2
*जेथे जातो तेथे तू माझा सांगाती,चालविसी हाती धरोनिया* असं तुकाराम महाराजांनी लिहिलं आहे. त्या प्रमाणे तुझी सिंगापूर ट्रिप मी सुद्धा इथे बसून enjoy करतोय.एखादा गाईड काय सांगेल इतकी इत्यंभूत माहिती तू दिली आहेस. याआधी तू जे लिहिलं होतस तो फक्त टिझर झाला असं म्हटलं होत त्या प्रमाणे हा तुझा सविस्तर अनुभव आहे.
तुझी पाण्याची भिती कासच्या ट्रिप मध्ये नाहीशी झाली होती म्हणून तू ह्या राईडची मजा लुटू शकलीस. आपल्या GT च्या अनेक फायद्यांपैकी हा पण एक फायदा
काचेच्या अजस्त्र भिंती आड उभं राहून पल्याड मासे फिरताना बघून मजा वाटली असेल .Sound and Light शो बद्दल तू लिहिलं आहेस ते वाचताना मला दिल्लीच्या लाल किल्ल्यात असणारा असा शो आठवला. अगदी तसाच दुसरा शो काश्मीर मध्ये सुद्धा पहिला होता.
तिथल्या Fullerton Hotel बद्दल लिहिताना इंग्रजांनी केलेल्या सोईंचा फायदा स्थानिकांना पण झाला असं ज्या वेळी तू म्हणतेस त्या वेळी मला जेवताना बाहेर चित्राहुती घालतात त्याची आठवण आली. ह्या इंग्रजांनी मलिदा खाल्ला आणि आपण मात्र धनी झालो चित्राहुतीचे. अशा कित्येक खुणा त्यांनी केलेल्या जगभरातल्या वसाहतींमध्ये दिसतात. एक मात्र खरं की हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यावर ५६५ संस्थानं विलीन होऊन एकसंध भारत तयार झाला.हे थोडस विषयांतर झालं.पण लिहावं वाटलं म्हणून लिहिलं.
तिथे फोटो खूप फोटो काढले...पण , ह्या प्रेक्षणीय स्थळांपेक्षा, तिथे उभी असलेली मी ... असेच सगळे फोटो आले ! असं लिहिलं आहेस पण त्या सगळ्यांच्या बरोबरीने आमच्यासाठी तरी तू देखील ........ आहेस. असं म्हणायचं कारण म्हणजे तुझी एव्हडी लांबलचक वेणी पाहून तुझा सुद्धा फोटो कोणीतरी काढला असेल असं वाटलं.
तू प्रत्यक्ष अनुभवलेली ही ट्रिप तुझ्या लिखाणामुळे आम्हाला सुद्धा virtual का होईना मजा मिळाली.
प्रसाद
Thank you , Prasad !
Deleteअलका खूप छान वर्णन फोटोग्राफी अप्रतिम नेहमीप्रमाणे हुबेहू प्रवासवर्णन सर्वात छान
ReplyDeleteThank you so much !!😊
Delete