जम्बो ते नॅनो

  लहानपणी माझा नेहमी एक problem  असायचा.  जरा उन्हात खेळलं, किंवा खूप जेवलं की  मला कसंतरी व्हायचं. पोटात ढवळायचं , चित्रविचित्र स्वप्नं पडायची. एखादी वस्तू खूप मोठी मोठी होतेय असं वाटायचं, आणि लगेच ती खूप लहान होत जायची. आई म्हणायची पित्त झालंय, वडील म्हणायचे हावरेपणामुळे indigestion  झालेय.  मग 'आजीबाईचा बटवा  ते  allopathy ' सर्व औषधांचा मारा होऊन बरं वाटायचं .  Alice  in  Wonderland  वाचायचे ते दिवस. तिलाही असंच पित्त होत असलं पाहिजे . 

    आताही तसंच होतंय, पण हे पित्त नाहीये. हा जागतिक फिनोमिना आहे. चाळीस एक वर्षांपूर्वी जम्बो जेट्स आली . जगातील मोठ्यात मोठे विमान असं त्यांचं वर्णन असायचं तर दुसरीकडे फक्त ४ - ५ माणसे जाऊ शकतील असं पर्सनल विमान ! तेंव्हा सगळं मोठ्यात मोठं असायचं, व्हायचं वेड होतं . अर्थात आत्ताही ते आहेच. मोठ्ठं दुकान, मोठ्ठं घर, उंचात उंच टॉवर. सगळं जम्बो नाहीतर मेगा.  त्याला काही स्मार्ट मंडळी  king - size पण म्हणायची , किंवा 'सुपर ' !   सुपर मार्केट , सुपर स्टार ! एकूण जम्बो युग सुरु झालं होतं . 

मोठ्या गाड्यांबद्दल एक जोक असायचा. दोन मित्रांमध्ये 'कोणाची गाडी मोठी' अशी चढाओढ होती. एकदा ते दोघं ट्रॅफिक सिग्नलला अचानक शेजारी  थांबलेले होते.  एक म्हणाला  "अरे बघितलंस का, माझ्या गाडीत मी खूप सोयी केल्यात. कपड्यांचे एक कपाट आहे, ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलो तर त्रास नको म्हणून फ्रीज अन डायनिंग टेबल आहे, शिवाय मागची सीट तर काय पलंगच आहे म्हण नं ..." .त्यावर दुसरा म्हणाला, " आणि हे एवढंसं सांगायला तू मला हाक मारलीस ?  ... चांगला अंघोळ करणार होतो...!!" काय वाट्टेल ते !!

    हे होतं आहे तोवर कॉम्पुटरचं युग सुरु झालं.  २८६, ३८६,..  pentium  मोठ्यात मोठा, नवीनात नवीन, १ GHz -  २ GHz , सगळ्यात वेगवान  कॉम्प ! १५" - १७" मोठा  स्क्रीन म्हणून आपण तो घ्यावा आणि ६ महिन्यात त्याहून मोठ्या  मॉडेलच्या जाहिराती पेपरात झळकायच्या.   त्यानंतर  लॅपटॉप येऊ लागले. त्यात सुध्दा आधी १२ इंची,मग १३ इंची स्क्रीन  करत करत १५ इंची येताहेत. ते जरा जुने होताहेत तोवर note - book आले. जरा हुश्श म्हणावं तर tab  हजर .  हे होत आहे तोवर मोबाईल फोन आले. आधी छोटे छोटे . फक्त फोन आणि sms . मग  काय त्यात कॅमेरे येऊ लागले. होता होता ह्या मोबाईल चा smart phone  कधी झाला ते कळलंच नाही. 

    स्मार्ट फोन म्हणजे फोन कसला !  त्यात फोन, निरोप , घड्याळ,गजर , timer , stop-watch , मेमो, इ - मेल, कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा, इंटरनेट, video games, TV , अगदी जाहिरातीं सकट आले.  आणि हे सगळं करतां करताच , जग हळू हळू लहान होत चाललंय.  लहानात लहान , आणि त्यातच मोठ्यात मोठं !!

    असं आता नॅनोचं  युग आलंय. कधी ड्रेस आणायला गेले की एक सेल्सगर्ल दुसरीला सांगते " jumbo size section for ma 'am..." . "ऑ ,  XXL पण नाही, एकदम जम्बो !      आजकालच्या मुलींचे कपडे मला कधी कधी नॅनो वाटतात . असं वाटतं , की धाकट्या बहिणीचा फ्रॉक ढापलाय , कधी कधी तर छोट्या भाचराचं झबलं !! पण म्हणायची हिंमत नाही !कारण , व्यक्ती स्वातंत्र्य ! , पण मग माझ्या व्यक्ती स्वातंत्र्याचं काय ?  

माझी  आजी म्हणायची, 'दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या  डोळ्यातलं मुसळ नाही दिसत.'  तिची ही आपली  नॅनो जम्बो  ची आयडिया ... !!

    आणि परवाचीच गोष्ट ... संध्याकाळी मुलगा म्हणाला , " आई तू आज स्वयंपाकातून सुट्टी घे. आपण पिझ्झा मागवूया .. आम्ही जम्बो म्हणजे super size  मागवतोय, तुला कसा हवाय ? small, personal   का medium  .. त्याला म्हटलं, "काहीही चालेल, तू म्हणशील ते  ..."    मनात म्हटलं  "आता काय,  शुगर अन् कोलेस्ट्रॉल पाहता ... नॅनो पिझ्झा असता तर बरं झालं असतं ...छोटासाच आहे म्हणून डझनाने मागवायचे ...आपल्या पुरी एवढे.... छान चीज - बीज घालून.... ! चार -पाच खाल्ले , तरी कोणी काही म्हणायला नको .... !!!!



Comments

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland