येऊ कशी अशी मी शाळेला

आत्ताच बोलावणं आलं हो बाई , 
लागावं का बॅगा भरायला ... 
येऊ कशी अशी मी शाळेला , हो 
येऊ कशी अशी मी शाळेला ।। 

       गणितामधी मला भोपळा मिळाला
       स्पेलिंगं सगळी लागली चुकायला 
       हिंदी नं ही माझा घातच केला 
       भूगोल बी लावतोय वाटंला ।।
      
सकाळचा गजर नाहीच वाजला
गणवेषाचा इसकोट झाला
वह्यांचा गठ्ठा हरवून गेला 
दप्तर लागलंय फाटायला ।।

                    ×××

       पन्नास वर्षं झाली शाळेला   
      केसांचा रंग लागला उडायला 
      वयाचं ओझं बांधा गाठीला 
      बाक ही आलाय पाठीला ।।

.... अशीच येऊ का मी शाळेला , 
हो, अशीच येऊ का मी शाळेला .....???

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

संध्याछाया भिवविती हृदया ...

Black is beautiful

सुगंध