कुरकुर करायची नाय ... १
म्हणे पहील्यासारखं आता काही राहीलंच नाही.
मला वाटतं, तुला अजून जग कळलेलंच नाही !
घरासमोरचा पारीजात आता नसेल कदाचित उभा,
पण मनातला पारीजात कधीच वठला नाही !
भले आता शाळेत चिंचा-बोरं नसतील,
पण चॉकलेट शेअरिंगची मजा नक्कीच कमी नाही !
रात्री अंगणात बसून आता भेंड्या लावत नसतील,
पण मित्रांबरोबर बार्बेक्यू नक्कीच बोअर नाही !
कामामुळे कदाचित , सतत भेटत नसतील,
पण भेटता क्षणी समजतं, कोणी दुरावलेलं नाही !
साधनं बदलली असतील, तऱ्हा वेगळ्याअसतील,
पण आनंदाची व्याख्या मात्र कधीच बदलणार नाही
सोमवारी चिकन खाल्लं म्हणून कोणी नरकात पडत नाही,
आणि लहानशी चूक होणं , हा गुन्हा ठरत नाही !
नवरा-बायकोचे वाद म्हणजे डिव्होर्स होत नाही,
खाऊचे दोन्ही वाटे खाल्ले की लगेच भाऊबंदकी असत नाही !
जराश्या बारीक दुखण्याला मरण म्हणायचं नाही,
बसल्या बसल्या उगीच ,राईचा पर्वत करायचा नाही
शेजाऱ्यांशी भांडण , आपण आवरतं घ्यायचं,
संस्कृतीचं लेणं आपणच मुलांना द्यायचं !
आईवडीलांचं देणं , चुकवून चुकत नसतं,
त्यांच्या ऋणांत रहाणं , हेच देणं असतं !
जरासं ताणलं तर तुटायला ते रबरबँड नाही,
एवढ्या तेवढ्यानं तुटेल ते नातंच असत नाही !
हरवून जातात ती नाती नसतात,
विसरून जातात ते मित्र नसतात ...
कारण, खोटं कधी टिकत नाही.
आणि खरं कधी विटत नाही !
खोट्याचं पितळ उघडंच पडतं,
सोनं नेहेमी झळकतंच रहातं !
सोनं का पितळ ... आपलं आपण ठरवायचं,
आपलं जग आपणंच घडवायचं !
जमेल तसं दुरुस्त करायचं,
जसं घडेल तसं संभाळून घ्यायचं ...
हां, एक मात्र ध्यानांत ठेवायचं ;
येता-जाता बाप्पाचं डोकं नाही खायचं ..... !
अगदी खरय ! इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर मिरवायचं नाही !
ReplyDeleteThank you ! ☺️
ReplyDeleteझकास
ReplyDelete- विनु
This comment has been removed by the author.
DeleteThank you very much , विनू
Deleteलकी
ReplyDeleteएकदम टकाटक
उगाच डोक खायच नाय
आपला नाद करायचा नाय
प्रमोद
खूप खूप thank you , प्रमोद
Delete