कुरकुर करायची नाय ... १


    म्हणे पहील्यासारखं आता काही राहीलंच नाही. 
    मला वाटतं, तुला अजून जग कळलेलंच नाही !

घरासमोरचा पारीजात आता नसेल कदाचित उभा,
पण मनातला पारीजात कधीच वठला नाही !

    भले आता शाळेत चिंचा-बोरं नसतील, 
पण चॉकलेट शेअरिंगची मजा नक्कीच कमी नाही !

रात्री अंगणात बसून आता भेंड्या लावत नसतील,
पण मित्रांबरोबर बार्बेक्यू नक्कीच बोअर नाही !

    कामामुळे कदाचित , सतत भेटत नसतील,
   पण भेटता क्षणी समजतं, कोणी दुरावलेलं नाही !

साधनं बदलली असतील, तऱ्हा वेगळ्याअसतील,
पण आनंदाची व्याख्या मात्र कधीच बदलणार नाही 

  सोमवारी चिकन खाल्लं म्हणून कोणी नरकात पडत नाही,
    आणि लहानशी चूक होणं , हा गुन्हा ठरत नाही !

नवरा-बायकोचे वाद म्हणजे डिव्होर्स होत नाही,
खाऊचे दोन्ही वाटे खाल्ले की लगेच भाऊबंदकी असत नाही !

    जराश्या बारीक दुखण्याला मरण म्हणायचं नाही,
बसल्या बसल्या उगीच ,राईचा पर्वत करायचा नाही 

शेजाऱ्यांशी भांडण , आपण आवरतं घ्यायचं,
संस्कृतीचं लेणं आपणच मुलांना द्यायचं !

    आईवडीलांचं देणं ,  चुकवून चुकत नसतं,
    त्यांच्या ऋणांत रहाणं , हेच देणं असतं !

जरासं ताणलं तर तुटायला ते रबरबँड  नाही,
एवढ्या तेवढ्यानं तुटेल ते नातंच असत नाही !

    हरवून जातात ती नाती नसतात,
    विसरून जातात ते मित्र नसतात ... 

कारण,  खोटं कधी टिकत नाही. 
आणि खरं कधी विटत नाही !

    खोट्याचं पितळ उघडंच पडतं,
    सोनं नेहेमी झळकतंच रहातं  !

सोनं का पितळ ... आपलं आपण ठरवायचं,
आपलं जग आपणंच घडवायचं !

    जमेल तसं दुरुस्त करायचं,
    जसं घडेल तसं संभाळून घ्यायचं ... 

हां,  एक मात्र ध्यानांत ठेवायचं ;
येता-जाता बाप्पाचं डोकं नाही खायचं ..... !




Comments

  1. अगदी खरय ! इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर मिरवायचं नाही !

    ReplyDelete
  2. झकास
    - विनु

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. Thank you very much , विनू

      Delete
  3. लकी
    एकदम टकाटक
    उगाच डोक खायच नाय
    आपला नाद करायचा नाय
    प्रमोद

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप thank you , प्रमोद

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland