Posts

दिवाळीची तयारी

      दिवाळीची तयारी म्हटलं की माझ्या पोटात गोळा येतो.   खरं म्हणजे बरेच येतात ...       कुरुक्षेत्रावर अर्जुनाची झाली , तीच परिस्थिती ,  फक्त कोणी 'कृष्ण सखा' येऊन समोर ठाकत नाही.   खरं म्हणजे नवऱ्याला 'सखा' म्हटलं,  तर तो असतो समोर, पण आपण त्याला गोवर्धन गिरीधारी  role मधे पहात असतो, आणि कुरुक्षेत्र म्हंटल्यावर तो गीता सांगत असतो ... तू तुझं काम कर, फळाची - कौतुकाची  इच्छा किंवा अपेक्षा करू नकोस ... !!!   तर दिवाळीची तयारी ! .... स्वच्छता, डबे घासणं उरकलं .....रांगोळी, दिव्यांची माळ, आकाश कंदील, ... की actual चक्रव्यूहात माझी entry ... फराळाचे पदार्थ !!! ... कसे करायचे ते माहीत आहे, पण end result . .. ?   त्यातून मी कशी बाहेर पडीन ... सहीसलामत ,  यशस्वी होऊन  का धारातीर्थी पडून ... ?    लाडू-शंकरपाळे ... ok,   चिवडाही ok , ... पण चकलीचं आणि माझं पटत नाही.   एकवेळ चकल्या होतील, पण मग फराळाला आलेली मंडळी ... ... 'अमकीची चकली मऊ, तमकीचे लाडू जरा बसले, असं बो...

पाटीपूजन

    माझ्या - आपल्या लहानपणी एक खूप छान प्रथा  होती.  खंडेनवमी - आयुधपूजेच्या दिवशी आपल्या शाळेत पाटीपूजन असायचं !   दोन तीन दिवस आधी वर्गात 'सूचना'  यायची !   की लगेच त्याचे वारे वाहायला लागायचे . हे सर्व चौथीपर्यंत लहानशा शाळेत !   एकदा दसऱ्याच्या आधी आणि मग गुढीपाडव्याला !   दोन पर्वण्या असायच्या !   आदल्या दिवशी शाळेतून घरी जाता जाता सगळं ठरायचं ... सांघिक पाटी धुणं !   कोणी कोणी कुणाच्या घरी जायचं, काय काय बरोबर घेऊन यायचं वगैरे ...      "आज पाटी धुणार आहे" ,   म्हटलं की आईचं सुरु व्हायचं ... "मागच्या दारी ... पायरीवर ... घरात नाही ... सगळ्यांना मिळून एकच बादली पाणी मिळेल ... फडकं ही एकच मिळेल ... कोळसा ही प्रत्येकाला एकच ... सगळे कोळसे ओले करून ठेवायचे नाहीत ... आणि मुख्य म्हणजे फ्रॉक बदला, जुना घाला ... हा काळा करायचा नाही ... "    माझ्या आईचं माझ्यापेक्षा माझ्या फ्रॉकवरच जास्त प्रेम असावं ...तिला त्याचीच भारी चिंता असायची !     "आंबा खाताय ?... गॅलरीत ...

कुरकुर करायची नाय ... २

         कोणीतरी वाढदिवसाला virtual फुलं आणि best wishes नी WA भरून जातं , म्हणून कुरकुर केली ...मग मी लिहून टाकलं ... बास झाल्या शुभेच्छा,  बास झाली फुलं ....???. असं नाही का वाटत, की तुझंही काहीतरी चुकलं ?     सांग  मला, किती जणींना घरी जाऊन भेटलीस,     चहा - बिस्किटं खात, मनमुराद गप्पांत रमलीस ?        नेहमीच्या घडामोडीत, गप्पांना वेळ नाही,        रोजच्या रडगाण्यात, हसायला वेळ नाही.         रस्त्यातला ट्रॅफिक, कुठे जाऊ देत नाही,       चिंता आणि कटकटी, कुणाशी बोलू देत नाही.  खरं खरं जाता आलं नाही, तर खोटं खोटं तरी जावं, मिठी मारता आली नाही, तरी WhatsApp वर             भेटावं खरी माणसं दिसत नाहीत  , त्यांना व्हीडिओत तरी             पहावं, कार - बस - विमान नको,  मनानीच तिथे जावं ,  आनंद किंवा दुःख,  कुणाशी तरी बोलावं, मनात आलं ते, कुणाला तरी सांगावं.  ...

कुरकुर करायची नाय ... १

    म्हणे पहील्यासारखं आता काही राहीलंच नाही.      मला वाटतं, तुला अजून जग कळलेलंच नाही ! घरासमोरचा पारीजात आता नसेल कदाचित उभा, पण मनातला पारीजात कधीच वठला नाही !      भले आता शाळेत चिंचा-बोरं नसतील,   पण चॉकलेट शेअरिंगची मजा नक्कीच कमी नाही ! रात्री अंगणात बसून आता भेंड्या लावत नसतील, पण मित्रांबरोबर बार्बेक्यू नक्कीच बोअर नाही !     कामामुळे कदाचित , सतत भेटत नसतील,    पण भेटता क्षणी समजतं, कोणी दुरावलेलं नाही ! साधनं बदलली असतील, तऱ्हा वेगळ्याअसतील, पण आनंदाची व्याख्या मात्र कधीच बदलणार नाही    सोमवारी चिकन खाल्लं म्हणून कोणी नरकात पडत नाही,     आणि लहानशी चूक होणं , हा गुन्हा ठरत नाही ! नवरा-बायकोचे वाद म्हणजे डिव्होर्स होत नाही, खाऊचे दोन्ही वाटे खाल्ले की लगेच भाऊबंदकी असत नाही !     जराश्या बारीक दुखण्याला मरण म्हणायचं नाही, बसल्या बसल्या उगीच ,राईचा पर्वत करायचा नाही  शेजाऱ्यांशी भांडण , आपण आवरतं घ्यायचं, संस्कृतीचं लेणं आपणच मुलांना द्यायचं !     आईवडीलांचं देणं ,...

भेंड्या

    .....      "आता लपाछपी बास !   संध्याकाळ झाली, आता या,  बसा पायऱ्यांवर आणि दुसरं काहीतरी खेळा ...", आईचा आवाज.    बरोबर सूर्यास्ताला ती आवाज द्यायची.   जरा अंधार पडायला लागायचा ... आणि आम्ही ४ - ५ मैत्रिणी घरासमोरच्या पायऱ्यांवर येऊन बसायचो ... 'ए आता काय खेळूया ... भेंड्या ... गावांच्या नावाच्या ...'      ते व्हा गाण्यांच्या भेंड्या खेळायला , तेव्हढी गाणी - सिनेमातली - माहीत नव्हती ! शाळेत वर्गात गाण्याच्या भेंड्या !!   मैत्रिणी गाणी म्हणायच्या, ते ऐकून लक्षात ठेवायचं, इतकंच सिनेमाचं ज्ञान होतं ... अन गाण्यांचं ही  !      तर ... श्रीगणेशाय नमः !   भेंड्यांची सुरुवात हीच !   मग रोजची चर्चा !   'म'  पासून का आज 'ह'  पासून ... मग 'म ' हे अक्षर ठरलं, अन गाडी सुरु !    म ... मुंबई !   ... इ ... इटारसी !   स ... सांगली !   ल ... लासलगाव !   ... ऑर्डर ही ठरलेली !   परवचा म्हणतांना श...

C C D

      कोणाला कशाची allergy असते तर कोणाला कशाची !    मलाही आहे ... बऱ्याच गोष्टींची ... काही पदार्थांची, काही सुगंधांची आणि अगदी काही शब्दांची सुद्धा !...     जसं कोणी 'गोची' म्हटलं की मला सगळीकडे खाजायला लागतं .    मला अजून एक शब्द आवडत नाही तो म्हणजे 'योगा' ... !    मी योगा करायला जाते असं म्हटलं कुणी,  की वाटतं "अगं बये, योगासनं करायला जाते असं म्हण ना ... आपण फॉरीनवाल्यांसारखं 'योगा' का म्हणायचं ?   माझं शब्दावरच थांबत नाही.   मला योगासनं करायला ही आवडत नाही.      तर या 'योगा'चं   आणि माझं अजिबात पटत नाही ... आमचे योगच जुळत नाहीत.   मी शाळा-कॉलेजात असतांना हे योगाच खूळ इतकं माजलं नव्हतं किंवा ते आमच्यापर्यंत पोहोचलं नव्हतं.   दर शनिवारी सकाळी  P. T. च्या तासाला जी काही कवायत किंवा  mass P. T. म्हणजे  जे काही हातापायांचे प्रकार करवून घ्यायचे, तिथपर्यंतच माझी मजल !   नृत्य वगैरे प्रकार आपल्याला झेपणारेच नव्हते.   त्यामुळे 'य...

रुमाल

        ' दूंगी तेनु रेशमी रुमाल,  ओ बांके जरा डेरे आना ... '     प्रेमपुजारी सिनेमात एक लाल रुमाल घेऊन वहीदा रेहेमान छान dance करते नां !   तिचा तो हातखंडाच , तिच्या हातातला लाल रुमाल ही खूप मस्त दिसतो ...      रुमाल ही अशी चीज आहे ,  की ती छानच असावी !   केवळ एक कापडाचा चौकोनी तुकडा ... असं त्याचं रूप होऊ शकत नाही,  की केवळ utility item - वापरायची वस्तू असंही होऊ शकत नाही !   रुमालावर कधी नाजूक फुलाफुलांचं print, आणि त्याला matching दोऱ्याने कडा शिवलेल्या, त्याही सुबकपणे, कधी अगदी नाजूक अशी लेस, कधी हाताने केलेली किंवा मशीनची !   असं वाटतं की 'व्यक्ती तितक्या प्रकृती 'हे रुमालाबद्दलच लिहिलेलं असावं ! प्रत्येक    रुमालाला स्वतःचं असं व्यक्तिमत्व असतंच असतं.  आणि  खरं म्हणजे ,त्यावरून तो रुमाल ज्याचा किंवा जिचा असेल तिच्याबद्दलही  बरंच कळतं !             माझ्या लहानपणी माझ्या वडिलांचा रुमाल खूप मस्त दिसायचा.   पांढरा शु...