Posts

सुनीता विल्यम्स

     सुनीता  विल्यम्स  ... ती परत आल्यापासून माझ्या डोक्यात विचारांचं थैमान सुरू आहे ...ती कोण आहे... ?... एक दुर्दम्य आशावाद ... का विश्वास ... मग तो देवावर किंवा आपल्या विज्ञाननिष्ट विचारांवर, आपल्या सहकाऱ्यांच्या कर्तबगारीवर, हुशारीवर ? ... का मन भारून टाकेल , अशा आत्मविश्वासावर - conviction वर ... ?    ह्यातलं काय आहे तिच्यात ?    कशाची बनली आहे ती ?    माणसासारखी माणूस, स्त्री सारखी स्त्री ...मग कुठल्या का वंशाची , देशाची असेना ...का कुठल्या धातूने , कुठल्या तरी अतिमानवी इच्छेने, ध्येयाने किंवा अफाट, अचाट शक्तीने घेतलेलं मानवी रूप ?  .... काय आहे ती ?     ती आठ दिवसांकरता अंतरिक्षात गेली space station वर.   आपण हे असं बोलतो, इतकं सहजतेने ... जसं काही पुण्याहून मुंबईला गेली ... नोकरीला ... सकाळी जाऊन संध्याकाळी परत येणार असं ... आणि तिथे अडकली ... जसं काही , मुंबईत पाऊस पडल्यावर लोकल बंद पडाव्यात ... आणि मग   ... मग काय ?   किती गदारोळ होतो त्याचा, social media काय, न्यूज काय, पेपर...

Live - In ...

      नुकतीच एका कार्यक्रमाला जाऊन आले.   मैत्रिणीच्या मुलीच्या डोहाळजेवणाला असेल.   त्यामुळे सर्व बायकांचं राज्य होतं.  आम्ही मैत्रिणी एका बाजूला बसलो होतो आणि बाजूला तरुण मुलींचा मोठा ग्रुप होता.   मस्त दंगा चालला होता, अगदी मोकळेपणानी, आणि मुलींचा मोकळेपणाने दंगा म्हटलं की काय काय बोलणं चालू असतं, ते न विचारलेलं - न सांगितलेलं बरं  ...      तेव्हा , चिडवाचिडवीमधे आता पुढचं डोहाळजेवण, बारसं कुणाकडे ? ... असा 'passing the parcel' चा खेळ चालू होता - बोलून खेळायचा ... मधेच कुणाचं तरी नाव आलं. छान नटून थटून ,  गळ्यात मोठ्या काळ्या मण्यांची माळ घालून बसलेली मुलगी .  ती पटकन म्हणाली, "अगं, लग्न तर होऊ दे आमचं. मग बघू. " ...   " म्हणजे ?"...   "अगं मावशी, आम्ही सध्या live-In relationship मधे आहोत ... आमचं जमलं, तर लग्न, नाहीतर तata, bye-bye... nice to have met you  ... "    'ऑ '?! ... माझा 'आ ' च  राहीला !    असं खरंच , actually  असतं ? फक्त गोष्टी  लिहि...

महिला दिनाच्या निमित्ताने

      आंतरराष्ट्रीय महिला दिवस ... नेमेचि येतो मग पावसाळा ... शब्दशः ...' नेमेचि' ह्या शब्दात त्याचं दरवर्षी येणं, आणि 'पावसाळा' ह्या शब्दात, सगळ्यांना येणारं अश्रूंचं भरतं ... पावसाळा  ... तात्पुरता ... मग शेफाली शहा म्हणते तसं, सगळं नेहमीचं ... गुलाबी, अश्रूमय, थापेबाजी, ... एक दिवस मखरात बसवायचं, अन् दुसऱ्या दिवशी ... ये रे माझ्या मागल्या  ...      पण आज आठवण होतेय ती माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व जणींची, ज्यांनी माझं आयुष्य घडवलं ... आणि बिघडवलं ही  ... कुणाला वंदू अन् कुणाला निंदू ... पण गोष्ट आहे , ती माझ्या सर्वात जुन्या पूर्वजाची ... जिला मी खरं खरं पाहीलं ... ती माझी पणजी ... तसं पाहीलं , तर ती सामान्य स्त्री होती, पण ती कधी 'असामान्य' झाली,  ते नंतर केव्हातरी कळलं ...      इस्लामपूर मधे १८८३ च्या आसपास जन्मलेली आणि वयाच्या दहाव्या वर्षी लग्न होऊन पटवर्धनांच्या घरात आलेली मुलगी... लिहिता वाचता येत होतं ... यजमान त्यावेळी डॉक्टर होते. काही वर्षांनी , दोन-चार कुटुंबांबरोबर हे दोघे दोन मुलांना, म्हणजे , माझ्या आजीला आ...

खजिना

Image
      गुढी पाडवा जवळ आला की , मला खूप उत्साह येतो !  घर आवरायचं, पुन्हा एकदा स्वच्छ करायचं ... उत्साहाचं आणखी एक कारण म्हणजे थंडी, गारठा संपतो आणि मी जरा thaw व्हायला लागते.  काल तसंच झालं ... आणि माझ्या बरोबर hibernate करणारं माझं पेन - कागद ... सगळेच जागे झाले ...      सकाळी नवऱ्याला म्हटलं ... जरा बघ रे, घराचा नुसता कबाडा झालाय ... सगळं काही loft वर ढकलतोय आपण, ते आवरुया ना जरा ...... म्हंटल्याबरोबर शिडी काढून त्यावर चढला , तर तो नवरा कसला ?.... नवरा-बायको complimentary , म्हणजे पूरक ... त्यामुळे मी उत्साहात की , तो ढेपाळलेला ..." हं ... loft पेक्षा आधी जरा पलंगाखालच्या बॅगा आवर नं ... loft उद्या ... !" ..."काय आहे पलंगाखाली ... एक सुटकेस ... त्यात पडदे आहेत . पुण्याच्या नवीन फ्लॅट साठी, दुसऱ्या बॅगेत ... आठवणी ... मुलांचे लहानपणचे काही कपडे ... एक झबलं, एक-दोन स्वेटर्स ... दोन फ्रॉक्स ... हो, मी हौसेनी शिवलेले, आणि ते मुलांना घालून फोटो पण काढून घेतला ... माझी हौस मुलीची ... आणि एक बॅग रिकामी आहे ... "आणि ... तो कुकरचा खोका ?" ... कुकर .....

२६ जानेवारी

      २६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन  .  कधी नव्हे ते लवकर उठून, स्वैपाक, अंघोळ, देवपूजा आटपून ९च्या ठोक्याला मी TV समोर हजर ... परेड पहायला !    बाकी इतर वेळी ,  कोणाचं सरकार असो , त्याला घालून-पाडून बोलायला कमी न करणारी मी, परेड पहायला बसले की त्यांचं कौतुकच वाटतं, आणि  'अभिमानाने ऊर भरून येणे'  म्हणजे काय ते कळतं ..!   भले ही TV वर सगळं दाखवत नसतील, आपण super-powers पेक्षा ranking मधे खूप खाली असू, पण आपण अगदीच 'बिचारे' नाही आहोत , असं वाटतं.    एरवीचा गलथानपणा, मुजोरी, बेशिस्तपणा,   'चलता है' अशी प्रवृत्ती, भ्रष्टाचार, महिलांना दिली जाणारी वर्तणूक ... घरात-बाहेर सगळीकडेच ... हे परेडमधे कुठे दिसत नाही, आणि जिवाला 'सुकून' मिळतो.   ' दिलासा' हा शब्द कमी पडतो,  'सुकून' मधे जो  'सुकून' आहे तो special च ... !!      दिल्लीतला विजयपथ, राष्ट्रपती भवन, हे सगळं इंग्रजांनी बांधलं, पण त्याची चाळण नं  करता, आपण ते निदान नीट  maintain करतोय ह्याचं अप्रूप वाटलं....

निर्भया

  आज सकाळी सकाळी पेपरातील बातमी वाचली, आणि मूड गेलाय ... मूड गेलाय हे म्हणणं, understatement ... नव्हे  gross understatement of the decade   ... त्या कलकत्त्याच्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली नाही,  कारण हा गुन्हा 'rarest of rare' असा नाही ,  हे वाचलं  आणि ... काय काय झालं म्हणून सांगू ... रक्त खवळून उठलं ... डोक्यांत  एक महा प्रचंड तिडीक गेली ...   अंगात आगीचा डोंब उसळला ... आपल्या अंगात कुणीतरी खंजीर खुपसावा असं काहीतरी आत तुटलं ... आणि हे definitely कलियुग आहे हे पटलं ... एरवी विशेष देव वगैरे न मानणारी मी ... अगतिकपणे देवासमोर उभं राहून म्हणावसं वाटलं ... तुझ्या राज्यात हे काय चाललं आहे .?.. पण त्याला जाब विचारणारी मी कोण ..?. अगतिकपणे.....कारण,  केवळ असहाय्य्य अशी मी ... ना पुरेसं धैर्य, ना resources , ना कुठे वट, ना powerful connections ... नुसतं सभांमध्ये ,  मंडळात वगैरे बडबड करून,  मोर्च्यांत सहभागी होऊन  , भाषणं ठोकून, काहीही होत नसतं ... केवळ एकाच शब्दात सांगायचं तर ... हे सगळं केवळ पोकळ ....     नि...

दिस चार झाले ...

         शाळेत असतांनाची गोष्ट.   एकदा रेडिओवर एक श्रुतिका लागली होती.   नाव-गाव काही आठवत नाही.  त्यातली गोष्ट थोडीफार आठवते.   पण त्यात एक गाणं होतं ... मन पाखरू पाखरू, किती दूरवरी जाय ... !   कोणी गायलं होतं माहित नाही, पण त्या मुलीचा आवाज, चाल आणि हे शब्द.  कसे कुणास ठाऊक ... मनात जाम घट्ट जाऊन बसले ... न विसरण्यासारखे ..! मनाचं पाखरू ...कसं , कधी , किती दूर आणि कुठे जाईल , काही सांगता येत नाही ...त्याचा वेग ही कसा , तर निमिषार्धात पोचलेलं असेल ...अशा अर्थाचं गाणं . आणि जेव्हाही मी खूप अस्वस्थ होते, विनमस्क अशी असते, तेव्हा ते शब्द आपोआप येतात ... आणि , मी माझ्या आवडीच्या गावात , सांगलीतल्या घरात पोचलेली असते , मन आपोआप शांत होतं .. !आणि ,   ते शब्द माझ्या मनांत नाचत असतात , सतत .....      १५-२० दिवसांपूर्वीची गोष्ट ... खूप थंडी ... सतत  बुरबुर पाऊस ...  एकही गोष्ट मनासारखी जमत नव्हती ... कोणाचंच काहीही पटत नव्हतं ... सगळं  एकसुरी, एकरंगी, grey रंगाचं जग ... अर्धवट झो...