Posts

मालगुंड ट्रिप

Image
     "काय ?   येणार का ट्रिपला ?   जायचं कोकणात ?" ...      सतीशचा फोन आला आणि मी चकीत !!      एका पाठोपाठ एक धक्के !    एकतर सांगलीहून सतीशचा फोन,  ट्रिपला येतेस का , विचारायला,  ती ही कोकणात !    "येते की... "  म्हटलं आणि  तयारीलाच लागले !  ३ महिन्यात पुन्हा  GT  ! ...  मालगुंड आणि गणपतीपुळ्याला  जायचं ठरलं !     आणि मग planning सुरु !   GT  सारखंच !      रोज रात्री कामं धामं आटोपली की फोनवर फोन ... मी हे आणते, त्याला ते आणायला सांगू, अमका हे करेल, तो ते करेल ...नव्हे ...केलं , झालं ,असंच !     ... सतीश आणि अनील !   दोघे  सगळ्यांसाठी एक पायलट ट्रिप करून आले !   दोघे सगळं बघून, शोधून आले !    त्यांनी पाठवलेले फोटो आणि VDO  अप्रतीम !  मुळात , हे सर्व आपल्याच देशात, नव्हे,  आपल्या महाराष्ट्रातच आहे, हे पाहून तर इतकं छान वाटलं !   झक मारत गेले जगभरचे समुद्र...

तुझं माझं जमेना ... २

    काही कुळं अशी असतात की त्यांचं आणि आपलं कधीच पटत नाही ... पण तरीही वेळ आली की आपल्याला त्यांचीच आठवण येते आणि मनाविरुध्द आपले पाय त्यांच्याकडेच वळतात.   Strained relationships !    Strain आहे तर मग relation कशाला ठेवायचं ?  कारण नवीन प्रयोग करायची भीती वाटते किंवा 'जास्तीत जास्त काय होईल ?' असा प्रश्न स्वतःला विचारून आपण मनाचं समाधान करून घेतो.       शिंपी !   ज्याच्याशी कधी पटत नाही, पण त्याच्याशिवाय दुसरा पर्याय ... आता हळूहळू येताहेत, पण इतकी वर्षं नव्हते.         मला आठवतं !   लहानपणी तिसरी - चौथीत असतांना ,  आजोळी गेलं की आई पहिलं काम काय करत असेल, तर आम्हाला घेऊन शिंपी गाठणे.   "माणिकराव,  मुलींचे फ्रॉक शिवायचेत.  आठ दिवस आहे मी इथे ... "      "अरे वा, कधी आली  माहेरवाशीण बाई इथे ? आणि काय हो , असं आठ दिवस यायचं आणि चिमण्यांसारखं भुर्रकन परत जायचं ? "      माणिकराव चष्म्यावरून पहात बोलायचे.   "आई, मी आधीच स...

गूगल aunty

      एकदा " L aughter the best medicine"  मध्ये खूप छान गोष्ट वाचली होती.   एक बाई मैत्रिणीला आपल्या सुट्टीतल्या trip बद्दल सांगत होती .  घरच्या गाडीने कसे सगळे गेले, मग बर्फाच्छादित शिखरं,  घाटवळणाचे रस्ते,  उंच उंच हिरवीगार झाडं, मधूनच दिसणाऱ्या दऱ्या,  सरोवरं  ... ऐकता ऐकता मैत्रीण म्हणाली, "अगं, पण तू तर म्हणत होतीस की तुम्ही समुद्र किनारा दाखवणार आहात मुलांना ... सुंदर beach , वाळूत किल्ले -घरं ... तिथे आराम खुर्चीत पहुडून तू पुस्तक वाचणार आहेस,  मग एकदम डोंगर - दऱ्या  ... ?"        असं म्हटल्यावर त्या बाईला रडूच फुटलं.       "काय सांगू बाई,  माझ्या नवऱ्याला पत्ते - रस्ते  विचारायला बिलकुल आवडत नाही ... मग काय करु गं मी ?"   गोष्ट अमेरिकेतली असो नाहीतर कुठलीही ...  तात्पर्य काय, तर नवरे लोकांना कोणाला विचारायला आवडत नाही, पत्ता असो का रस्ता !      मग मी आणि माझा नवरा त्याला अपवाद कसे असू ?     त्याला पत्ता विचारायला आवडत न...

मुगुट

      कधी कधी आपल्याला घर आवरायचं भरतं येतं. उत्साहाच्या भरात , आपण अगदी  माळ्यावरच्या बॅगांपासून सुरु करतो, आणि पहिल्याच बॅगेत आपल्या आवरायच्या इराद्याचा शेवट होतो ....     एकदा ,  मी अशीच एक बॅग काढली, त्यात काय आहे ते आठवत नव्हतं म्हणून . आणि त्यात जुन्या फोटोंचे अल्बम सापडले !   "इतके फोटो काढले आपण" ... "तेव्हा फिल्म लागायची ना"... "इतके पैसे उधळले "... "तेव्हा मोबाईल नव्हते ना कॅमेरावाले "... "असू दे रे , त्यामुळे आज बघ किती सुंदर आठवणी पुन्हा हाती लागल्या ..."..." निव्वळ अडगळ ..."!    दोन मनांचे संवाद मी ऐकत होते.   एक माझं मन आणि दुसरं नवऱ्याचं मन  .... शिडीवर चढून बॅग काढायला लागल्याचं दुःख बाहेर येत होतं  !      हा बघ काय मस्त फोटो !   फोटो  मुलांचा ! दोघे मुगुट घालून बसलेले !  मन ३० - ३५ वर्ष मागे गेलं  ... मुगुटांची आठवण ... त्या दिवशी गुरुवार होता.   हो नक्कीच आठवतं, कारण सासूबाईंच्या मैत्रिणी गुरुवारच्या भजनाला येणार होत्या.   आपल्या घरी का...

अधेली

      अधेलीची गोष्ट खूप जुनी आहे.   एक राजा होता.  त्याच्या राज्यात एक माणूस होता.  रोज संध्याकाळी तो माणूस राजवाड्याच्या कोटाबाहेर यायचा, तिथे दोन मिनिटे थांबून, काहीतरी बघून निघून जायचा.  त्याचा हा कार्यक्रम राजा रोज खिडकीतून बघायचा.   एक दिवस न राहवून त्याने त्या माणसाला बोलावून तो रोज काय करतो ,ते विचारलं.   माणूस म्हणाला, "राजेसाहेब, त्या भिंतीच्या  एका फटीत मी माझी अधेली जपून ठेवली आहे, ती रोज बघतो."    राजा म्हणाला, "अरे मी तुला १० मोहोरा देतो, त्या बदल्यात ती मला दे.   एवढी अधेली ती काय ..."      पण तो माणूस तयार होईना.   राजाने त्या अधेलीच्या बदल्यात बरंच काही देऊ केलं, पण माणूस अडूनच.   शेवटी राजा म्हणाला, "बरं, तुला अर्ध राज्य देतो ... तू म्हणशील तो हिस्सा ... "      तेव्हा तो माणूस खुलला अन म्हणाला, "हा इकडचा अर्धा हिस्सा, ... कारण ... त्या भागात माझी अधेली असेल !"   राजा हतबुध्द ... !         पुढे काय झालं ...

संक्रांत

    'हॅपी न्यू ईअर' ची झिंग उतरते,  आणि संक्रांत समोर येऊन उभी रहाते !   खरं म्हणजे ती उभी रहात नाही.   ती कुठेतरी चाललेली असते, ह्या दिशेने येऊन , त्या दिशेकडे !    तिचं वाहन, हातातली आयुधं, कोणत्या रंगाची साडी वगैरे तपशील पंचांगात असतो.  ती कुठूनही कुठेही जावो, ती माझ्याच दिशेने पहात  असते.   अनेक प्रश्न घेऊन, अगदी 'urgent',  'important', 'now or never'  अशी लेबलं घेऊन !   इतर कोणत्याही सणाची वाटत नाही , इतकी मला संक्रांतीची भीती वाटते ! ...      पहिला अर्जंट प्रश्न, मुलंच विचारतात !   "ह्या वर्षी तू काय आणणार आहेस looting ला ?"   "looting ?"  ह्या मुलांचं इंग्लिश - कम - मराठी फार ताप दायक असतं .   "हं हं , लुटायला !   तुम्हाला काय त्याचं ?"     मला लुडबुड खपत नाही अजिबात !    "काहीतरी खायची गोष्टच लूट ..."      "का ?"     "म्हणजे संपवता येते ...आठवतं का, तू मागे एकदा डबे लुटले होतेस ..."  ...

मशीन्स

       माझं आणि मशीन्सचं विशेष सख्य नाही, म्हणजे पटत नाही, अगदी खरं म्हणजे अजिबात आवडत नाहीत.  मशीन म्हणजे कोणतंही यंत्र, ह्या अर्थी ! माणसाने चाकाचा शोध लावला, ते एक साधन होतं !  कष्ट कमी करायला, वेळ वाचवायला, वगैरे !  मग या आणि अशा साधनांचा मेळ घालून यंत्रं बनली.  पण मुळात जर ही यंत्रं ,एक set of कष्ट दूर करून,  कष्टांचा दुसरा सेट देणार असतील,  तर काय उपयोग ?  आणि त्यामुळे वेळ वाचत नाहीच !     मिक्सरचंच उदाहरण घ्या.   सगळे म्हणतात , त्यात ताक-लोणी छान निघतं, अगदी घंटों का काम मिनटोंमे, पण ते लोणी  काढल्यावर त्या भांड्यात आणि झाकणात जो लडबडाट होतो,  तो स्वच्छ करायला काय कमी वेळ लागतो ?   जो वेळ वाचवायचा , तो त्या धुण्यात घालवायचा, आणि रवीने दही घुसळतांना जे विचार मंथन होतं , किंवा१०-१५ मिनिटं निवांतपणा मिळतो , तो ह्यात नाही !!  तेच food-processor चं.  त्यात कणीक  छान भिजवली जाते म्हणतात, पण हाताने कणिक भिजवतांना मनातली खुन्नस कणकेवर काढता येते. ती चांगली तिंबून घेता येते ! आणि ...