Posts

या या भुलाबाई...

   बघता बघता नवरात्र संपत आलं, दसरा आला  दोन दिवसांवर ... आणि कोजागिरी पौर्णिमेचे वारे वाहू लागले ... पण त्याच्या आधीच ललिता पंचमी पासून अजून एक मस्त उत्सव सुरूही झालाय ...      मुलींचा हादगा ... कोणी भोंडला म्हणतात ... आमच्या तिकडे, म्हणजे विदर्भात ... भुलाबाई !    तोच सण ... खास करून मुलींचा ... गाणीही थोड्याफार फरकानी तीच, आणि मुलींचा उत्साह ही तोच ... अफाट ... घट बसल्यापासूनच मुलींचे plans सुरू ... खुसुखुसु करत ... "ए, माझ्याकडे एक दिवस हं"...    "थांब, आधी पहिला दिवस माझ्याकडे" ... " हो, आम्हाला नकोच आहे ...पहिल्या दिवशी खिरापत काय ...सोपी असते ओळखायला" ... "ए, नको मग माझ्याकडे ... कुण्णा कुण्णाला ओळखता येणार नाही अशी मी आईला सांगणार आहे करायला ... !"...      तर ललिता पंचमी पासून संध्याकाळी मैत्रिणींकडे,  शेजारी पाजारी जाणे ... भुलोजी - भुलाबाईच्या मातीच्या मूर्ती आणून त्या फुलांनी सजवणे, रांगोळ्या काढणे आणि मग गाणी ... गाणी म्हणणे, खिरापत ओळखणे ... रोज एक गाणं जास्त म्हणायचं ! तेव्हा हस्त नक्षत्र असतं , म्हणून ,...

अलक

Image
       ' अलक' ... म्हटलं की आजकालच्या संदर्भाप्रमाणे आपल्या मनात  'अति लघु कथा'   हेच येतं .    हा एक  short-form   आहे ही ... पण  'अलक'  या संस्कृत मधील शब्दाचा अर्थ खूपच वेगळा आहे ... अलक म्हणजे केस ... लांब सडक, मऊ मऊ रेशमी, सुंदर केशकलाप - केश संभार वगैरे ... तो अचानक आठवला...... कालच मोठ्या जाऊबाईंना भेटायला गेले होते.   त्या इथे आल्या आहेत म्हणून ... आणि त्यांच्या बोलण्यात हा शब्द अचानक पुन्हा सापडला ... केसांवरून सहज गप्पा चालू होत्या ...      त्या सांगत होत्या ... "अगं, आमच्या लहानपणी वेणी घालणं म्हणजे एक मोठा कार्यक्रम असायचा ... एकत्र कुटुंब होतं ... सणवार - कार्य वगैरेंच्या निमित्तानी सगळी जमायची ... तेव्हा सगळ्या मुलीबाळींच्या वेण्या घालणं हे एक मोठं कामच असायचं ... मग घरातली कर्ती - मोठी बाई एखाद्या काकू-मामी-आत्या ला पकडायची,  आणि "आज तुला हेच काम, मुलींच्या वेण्या-फण्या तू उरक ... बाकी आम्ही बघतो" ... असा हुकूम सुटायचा ... आणि मग सगळ्या मुली आपापला कंगवा घेऊन नंबरच लावायच्य...

सुगंध

           आजच एक बातमी वाचली.   नुकतंच NY मधे  एक exhibition झालं.   किंवा तो एक मोठा event म्हणू. तिथे  Liz Taylor ने एका सिनेमात वापरलेलं scent ...जे  अगदी rare, almost इतिहासजमा, ते पुन्हा बनवलं गेलं आणि त्याचं लोकार्पण किंवा inauguration !   जगावेगळा सुवास ... तो ही जगातल्या हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या सुंदऱ्यांपैकी एकीने वापरलेला !  ' Scent of Mystery'   !   काय असेल, कसं असेल ... माहीत नाही, पण त्यानी माझ्या मात्र खूप  आठवणी जाग्या झाल्या ...      सुवास- सुगंध म्हटलं की  आवड निवड, त्याच्याशी जोडलेले प्रसंग, काही वाईट - काही चांगले, काही ह्या जगाच्या पलीकडले ... सगळं आलंच !  खूप वर्षांपूर्वी National Geographic चा एक अंक ह्यावरच होता.   त्यात Scent म्हणजे काय, ते कसं असतं, ते कसं करतात ...अशी खूप अफलातून माहिती होती ... आणि त्यात एक booklet होतं , त्यात छोटे छोटे चौकोन होते.   ते आपण scratch करायचे आणि त्यातून कसला वास येतो किंवा ...

सर्टिफिकेट

      बरेच दिवस आळसात,  सुखात घालवल्यावर, अचानक एक दिवस मला एक कल्पना सुचली - नव्हे आवडली.   फेसबुक वर वर-खाली करतांना एक 'सुविचार '  दिसला.   DE-CLUTTER !! ... Declutter your house, living-space, kitchen, wardrobe, your mind and lofts  !!!  ... जमेल तेवढंच करू ... म्हणजे आपला उत्साह किती टिकणार आहे, वेळ आणि आळस किती असणार आहे ?? ...         घरातलं विशेष काही disturb नं करता, 'declutter अभियान' सुरु करायचं ठरवलं.   ही मोहीम 'राबवायला'  'मनुष्यबळ'  हाताशी घेतलं, आणि loft वरची समोरची  पहिलीच दिसली, ती बॅग ओढली.   जुन्या तऱ्हेची airbag ... माझीच ... आणि तिच्याबरोबर आठवणींची पोतडीही !    लाल निळ्या रेक्सिनची, त्यावर ३-४ वेगवेगळ्या रंगांची फुलं ... एक 'बॉब कट' वाली मुलगी  ... आणि Air France असं लिहिलेलं ... इतपत 'फेमिनिझम' पुरायचं तेव्हा !...    कॉलेजच्या पहिल्या, आणि शेवटच्या - एकुलत्या एका ट्रिपला नेली होती ती ... अर्थातच, काही रम्य आणि काही  'not...

एका हाताची टाळी

    परवा मैत्रिणीशी फोनवर बोलत होते . दुसऱ्या एका मैत्रिणीची सहज चौकशी केली . तर ,  बोलता बोलता मैत्रीण म्हणाली, "अगं, मीच किती सारखी चौकशी करायची, खुशाली विचारायची तिची ?  मैत्री काय एकतर्फी टिकते का ?   एका हातानी टाळी कशी वाजणार ?"   आणि , मी   विचार करू लागले ...      ... एका हाताची टाळी ... किती वेगळी कल्पना आहे ... टाळी वाजवायला दोन हात लागतात.   स्वतःचाच दुसरा हात नाहीतर दुसऱ्या कुणाचा.   पण दोन हात हवेतच ...     माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे ... social animal ...  त्याला सुखात ,आनंदात जगायला त्याच्या अवती भोवती कोणीतरी हवं असतं.   मौखिक भाषा येते , म्हंटल्यावर तर नक्कीच हवं.   आणि मग आनंद-सुख-समाधान , कुणाचं कौतुक , दाखवायला expression हवं - म्हणजे टाळी आलीच !  आणि मग दुसरा हात ही हवाच !      अगदी लहान बाळाला 'टाळ्या पोळ्या गुळाच्या'  आपण शिकवतो.   ते बाळ पण टाळ्या वाजवत हसतं, जसं काही त्याला   आपण  expression...

Art without boundaries

       पंछी, नदिया, पवन के झोकें        कोई सरहद ना इन्हे रोके  ...      हे famous गाणं, ह्यात art - कला हा शब्द ही घालायला हवा होता. कारण ... कला -  मग ती कोणतीही असो, तो मानवी मनाच्या स्फूर्तीचा - आनंदाचा - creative energy चा आविष्कार आहे असं मला वाटतं ... त्याला कशाला हव्यात मर्यादा, सरहदी किंवा कसल्या limits ? ...  Copyright चे नियम सांभाळून जर कोणाला दुसऱ्या कुणाची कला आपलीशी करावी किंवा ती शिकावी असं वाटलं, त्यातून आपले काही विचार मांडावेसे वाटले, तर त्यात काही वावगं नसावं ...      काही कलाविष्कार हे खरंच स्थळ, काळाच्या सीमा पार करून जातात ... जशी रवी वर्मा यांची चित्रं !    ती आजही तितकीच सुंदर आणि ताजी वाटतात !   त्यांच्या चित्रातल्या व्यक्ती खऱ्या-खऱ्या, जिवंत वाटतात !   कोणी तसंच चित्र काढायचं म्हटलं , तर दहा वेळा विचार करेल !    आपल्या हळदणकरांनी काढलेल्या Lady with the lamp ह्या चित्राच्या कितीतरी नकला झाल्या, पण त्या नकलाच राहील्या !  ...

Alice in Wonderland - 4

Image
      Last and best  ... शॉपिंग ... !!!    एक दिवस धाकट्या सुनेबरोबर  - देविका बरोबर - फक्त शॉपिंग !   तिला तिच्या सासूचा make-over करायचाय ... तिने हट्टाने एक  T'shirt  आणि pant घेऊन दिली.   तिथून सुरुवात !   मग काहीही दिसलं की नातवंडांसाठी घ्यावं असं वाटायचं,  पण बॅगेत जागा नसणार हे कटू सत्य सतत समोर ... तरी थोडंफार घेतलंच.   भारी भारी सुंदर दुकानं, जिकडे तिकडे मोठे आरसे ... चमचमाट !   Stylish मुली - बायका ....त्यात मला मी फार  उपरी - out of place   वाटायचे !    नाही म्हणायला आल्या दिवशीच घेतलेले नवीन बूट मला जादूच्या बुटांसारखे वाटत होते !   कुठेही, कितीही फिरवून आणणारे, पाय नं दुखता !   थोडा खाऊ, चॉकलेट वगैरे दिवसभर खरेदी केली, पण तिथल्या बाकीच्या दुकानात आपण फारच फुटकळ वाटायचो मला !  मी प्रत्येक किंमत - डॉलर- रुपयांत किती ते बघायची , आणि मग नकोच वाटायचं ...पण घ्यावंसं ही वाटायचं ....द्विधा मनस्थिती ....! मग.... शॉपिंगचा खरा break-throug...